Breaking : रत्नागिरीत सुरु असलेल्या तटरक्षक दलाच्या परीक्षेत बनावट कागदपत्रे वापरणाऱ्या तिघांवर गुन्हा

रत्नागिरी | प्रतिनिधी

भारतीय तटरक्षक दल वायू अवस्थानच्या फायरमन पदाच्या परीक्षेसाठी येऊन बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक करू पाहणाऱ्या तिघांविरोधात बुधवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन्नी पालराम (28,रा.अलिपूर जिंद हरयाणा ), सोनू शिशुपाल (22,रा.भुंडगा कॅथल,हरयाणा, सन्नी सुभाष भोसला (23,रा.जिंद हरयाणा ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात तटरक्षक दलाचे प्रधान नाविक विमल रामकुमार जंगीड (सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,बुधवार 22 जून रोजी सकाळी 8.30 वा.भारतीय तटरक्षक दल वायू अवस्थानच्या फायरमन पदाची परीक्षा घेण्यात येत होती. त्यावेळी कार्यालयाच्या मेनगेटवर या तिघांची तपासणी केल्यावर त्यांच्याजवळ इलेक्ट्रॉनिक डीवाईस ब्लूटूथ, बनावट कागदपत्रे होती. त्याद्वारे ते शासनाची फसवणूक करत होते. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.

जाहिरात4