सर्वेश कोचरेकर याचे रोलर स्केटिंग प्रकारात गिनीज बुकात नोंद !

देवगड (प्रतिनिधी)
बेळगाव कर्नाटक येथे आयोजित केलेल्या विश्वविक्रम गिनिज बुक रेकॉर्ड मध्ये रोड रोलर स्केटिंग प्रकारात शानदार प्रदर्शन करीत तांबळडेग गावचे शंकर श्रीकांत कोचरेकर यांचे सुपुत्र कु. सर्वेश कोचरेकर यांनी ९६ तास ऑटो फॉर्मेशन प्रकारात स्केटिंग करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदविले आहे. सदर विक्रमी नोंद करताना त्याचे स्केच लाईफ ॲकॅडमी मिरा रोड चे प्रशिक्षक संतोष मिश्रा ,प्रफुल्ल खरात ,अमित मिश्रा, यांचे मार्गदर्शन लाभले आहे .तसेच या प्रतियोगीते करीता देश-विदेशातून १०३९ रोलर स्केटिंग खेळाडू सहभागी झाले होते .यात त्याने हा विक्रम नोंदविला त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. देवगड उद्योजक कै. के.टी. उपरकर यांचा सर्वेश हा नातू आहे.

जाहिरात4