असलदे ग्रा.पं.सदस्या प्रतिभा खरात यांच्या पक्ष प्रवेश नावाचा बनाव : उपसरपंच संतोष परब

कणकवली

आज असलदे येथील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेशाची बातमी आली यात भाजपच्या ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा प्रकाश खरात यांचा पक्ष प्रवेश झाला असे सांगण्यात आले .परंतू प्रतिभा खरात या ग्रामपंचायत मासिक बैठकीत उपस्थित होत्या.व त्यांचे पती प्रकाश खरात हे आपल्या स्वत:च्या दुकान मध्ये होते.हे दोन्ही उपस्थित नसताना त्यांचा पक्ष प्रवेश केल्याचा बनाव आला .तसेच असलदे येथील भाजपा बुथ अध्यक्ष प्रदीप हरमळकर यांच्या ही नावाचा उल्लेख होता.मात्र ते गेली आठ वर्ष राजकारणापासून अलिप्त आहेत .त्यांचा भाजप बुथ अध्यक्ष पदाशी कोणताही संबध नसल्याचे असलदे उपसरपंच संतोष परब यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात ते पुढे म्हणतात की,गेली अनेक वर्षांपासून भाजपचे बुथ अध्यक्ष म्हणून आनंद तांबे सक्षमपणे काम करीत आहेत. यामुळे आज जो पक्ष प्रवेश दाखवला गेला तो बोगस असून पक्ष प्रवेशकर्ते हे पूर्वीपासूनच शिवसेनेचे काम करीत होते. हा पक्ष प्रवेशाचा बनाव करुन संबधीत पदाधिकारी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. आज महाराष्ट्रातील स्थिती पाहता शिवसेनेची ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. आज नांदगाव पंचक्रोशीतील अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत.ही भाजपची वादळापूर्वीची शांतता असल्याचेही शेवटी असलदे उपसरपंच संतोष परब यांनी म्हटले आहे.

जाहिरात4