मळेवाड रस्त्यावर पडलेले झाड ग्रा.प. सदस्य अमोल नाईक यांनी केले दूर

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळेवाड सातार्डा रस्त्यावर पडलेले झाड ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांनी ग्रामस्थांसह बाजूला केले. झाड बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केल्या बद्दल वाहन धारकांनी आभार व्यक्त केले.
मळेवाड सातार्डा मार्गावर जांभळीचे भरड येथे रस्त्यावर आकेशि चे भले मोठे झाड उन्मळून पडले.यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.या संदर्भात अजित मसुरकर यांनी उपसरपंच हेमंत मराठे याना फोन करुन कल्पना दिली.यावेळी मासिक मीटिंग सूरु होती.

मात्र, वाहन धारकांची परवड होऊ नये म्हणून हेमंत मराठे व मळेवाड ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांनी घटनास्थळी जात झाड बाजूला करण्यासाठी कार्यवाही सुरू केली.सदस्य अमोल नाईक यांनी स्वतः कटर लावून रस्त्यावर पडलेले झाड तोडून ग्रामस्थ झिला केरकर,अजित मसुरकर,लाडोबा केरकर,ग्रामपंचायत शिपाई नंदू पालयेकर,महेश चराटकर व अन्य ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला केले.तसेच लाडोबा केरकर यांनी जे सी बी बोलावून उर्वरीत झाड बाजूला केले.

जाहिरात4