सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न

दापोली | प्रतिनिधी

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी येथे अंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटर च्या सारिका दीदी आणि श्रद्धा दीदी तसेच संतोष भाई मेहता फाउंडेशन अध्यक्ष श्री सुजय मेहता सर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्कूलच्या प्राचार्या सौ रीतु मेहता मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर सूत्रसंचालन तन्मय ताडफळे सर यांनी केले . आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी शाळेच्या क्रीडा शिक्षक संदेश चव्हाण सर यांनी मुलांकडून तसेच सर्व शिक्षक वृंदांकडून आसने आणि प्राणायाम करून घेतले. त्यानंतर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या ब्रह्मा कुमारी मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख सारिका दीदी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की व्यायाम केल्याने शरीर निरोगी व सुदृढ बनते तसे मनाला बळकटी मिळण्यासाठी ध्यान करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी मनुष्याच्या अंगी दया क्षमा असाली पाहिजे तसेच मुलांना काही उदाहरणे देऊन योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर मुलांना संतोषभाई मेहता फाउंडेशनचे अध्यक्ष सुजय मेहत सर यांनी स्कूलच्या विद्यार्थी साई प्रसाद ऊत्पल वराडकर वय बारा वर्षे यानी नुकतीच पुन्हा पंढरपूर अशी एक दिवशी 250 किमी ची वारी सायकलने 10 तास 35 मिनिटांत पूर्ण करून शाळेचे नाव मोठे केल्याने त्याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व यापुढे शाळेचे नाव सर्वांनी कला-क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे करा असे सांगितले. त्यानंतर मुलांनी आलेल्या पाहून योगाचे पिरॅमिड सादर करून रोगाची प्रात्यक्षिके दाखविली आणि सरतेशेवटी शाळेचे क्रिडा शिक्षक प्रा. संदेश चव्हाण सर यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

जाहिरात4