एकनाथ शिंदे आगे बढो… योगेश कदम आगे बढो हम तुम्हारे साथ है…’

दापोलीत समर्थनार्थ शिवसैनिक एकटवले

दापोली | प्रतिनिधी :

दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम व शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज दापोली शहरात अश्वारूढ पुतळ्याजवळ जमले होते. ‘एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है…योगेश कदम आगे बढो हम तुम्हारे साथ है..’आशा घोषणा देत केळसकर नाका येथे एकत्र आले होते. योगेश कदम गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त कळताच सूर्यकांत दळवी गटाकडुन योगेश कदम यांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच मोठ्या संख्येने योगेश कदम समर्थक एकत्र आले होते.

जे लोक राष्ट्रवादीत जाणार होते त्यांना पदे देण्यात आली आहेत पक्षनिष्ठा त्यांनी आम्हाला सांगू नये जर क कोणते चुकीचे पाऊल उचलतील त्यांच्या आम्ही तंगड्या तोडू शहरात फिरू देणार नाही असा संतप्त इशाराच माजी तालुकाप्रमुख प्रदिप सुर्वे यांनी दिला आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी शिवसैनिक महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात4