एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवरून सुनील प्रभू यांनी काढलेले आमदार बैठकीचे आदेश ठरवले रद्द

भरत गोगावले यांची मुख्य पक्ष प्रतोदपदी केली नियुक्ती

मुंबई ।

आपल्याकडे तब्बल ४६ शिवसेना आमदारांचे संख्याबळ असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी सध्या मातोश्री सोबत असलेल्या शिवसेना पदाधिकारी आ. सुनील प्रभू यांनी काढलेले आमदार बैठकीचे आदेश रद्द ठरवले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असे म्हटले आहेत तर शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती त्यांनी जाहीर केली आहे.

जाहिरात4