कणकवलीचा विकास करताना कुठलाही राजकीय पक्षभेद आम्ही करणार नाही -नगराध्यक्ष समीर नलावडे



कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाचे नगराध्यक्ष नलावडे यांच्याहस्ते झाले लोकार्पण

कणकवली( प्रतिनिधी)
कै . श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी या उद्यानाचे उदघाटन व्हावे यासाठी सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवकांनी एकमताने मान्यता दिली होती. आज हे उद्यान कणकवली शहरवासीयांसाठी खुले झाले आहे . उद्यानालगत असणारी राखीव जागा संपादित करून हायवे चौपदरीकरणानंतर उरलेल्या 9 गुंठे जागेत असलेले हे उद्यान भविष्यात आणखी विस्तारित स्वरूपात शहरवासीयांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे . कणकवली शहराचा विकास करताना कुठलाही राजकीय पक्षभेद आम्ही करणार नाही . शहरविकासासाठी निधी देणाऱ्या आमच्या सत्ताधारी तसेच विरोधी गटाच्या सर्व लोकप्रतिनिधींचे नेहमीच स्वागत आहे.असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.

हेही वाचा –    “महाराष्ट्रात नवे सरकार येणार,विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !” आम.नितेश राणे

हेही वाचा –   आता मातोश्री 11 अशी आय पी एल टीम बनवा

कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यान लोकार्पण कार्यक्रम नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते पार पडला. 75 लाख निधी खर्चून नूतनीकरण करून बांधण्यात आलेल्या श्रीधर नाईक उद्यानाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक , बांधकाम सभापती ॲड. विराज भोसले , आरोग्य सभापती संजय कामतेकर , नगरसेवक बाबू गायकवाड , शिशिर परुळेकर , नगरसेविका मेघा सावंत , कविता राणे , प्रतीक्षा सावंत , माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे , भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , रोटरी क्लब अध्यक्ष डॉ . विद्याधर तायशेटे , दीपक बेलवलकर ,उद्यानाचे ठेकेदार भोसले इंडस्ट्रीजचे प्रताप भोसले , एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण , ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर , रवींद्र मुसळे , गुरू पावसकर , राजश्री धुमाळे , प्राची कर्पे , भरत उबाळे, गंगाधर सावंत आदी उपस्थित होते .
यावेळी या उद्यानाच्या कामाची पाहणी करत असताना उदघाटनानंतर बच्चे कंपनीने गार्डन मधील खेळण्यांवर बसून आनंद लुटला .

जाहिरात4