विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर लांजा तालुका भाजपाचा जल्लोष

मंगळवारी लांजा भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून आणि जोरदार घोषणाबाजी करून करण्यात आला आनंदोत्सव

लांजा | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचा विजय असो च्या घोषणांनी मंगळवारी २१ जून रोजी लांजा शहर परिसर दणाणून सोडण्यात आला. निमित्त होते विधान परिषद निवडणुकीत भाजपने मिळवलेला अभूतपूर्व यशाचे. लांजा तालुका भाजपा पदाधिकार्‍यांच्या वतीने मंगळवारी सकाळी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत हा आनंदोत्सव साजरा केला.

विधान परिषद निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या अभुतपुर्व विजयानंतर लांजा तालुका भाजपाच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुरुवातीला फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून तसेच बाजारात आलेल्या लोकांना पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष महेश खामकर, तालुका प्रभारी वसंत घडशी, लांजा शहर अध्यक्ष प्रमोद कुरूप, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, हेमंत शेट्ये, नगरसेवक मंगेश लांजेकर, संजय यादव, नगरसेविका शीतल सावंत, ओबीसी सेलचे दादा भिडे, अशोक गुरव यांच्यासह शेखर सावंत, अतुल आवळेगावकर, बावा राणे, भरत कोळवणकर, विशू जेधे यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जाहिरात4