दाभोली – खानोली येथे डंपर च्या मागील चाकाखाली मिळून वृद्धाचा जागीच मृत्यू

वेंगुर्ले | प्रतिनिधी : तालुक्यातील दाभोली – खानोली नजीक दाभोली हळदणकरवाडी हम रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास गुरांसाठी चारा नेणारा बाबुराव गंगाराम मयेकर (63) याला दाभोलीकडे जाणाऱ्या खडी वाहक डंपर KA-70-3087 ची धडक बसून तो पाठीमागील चाकाखाली आल्याने चिरडून जागीच ठार झाला.

या बाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव यासह पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तसेच दाभोली सरपंच उदय गोवेकर पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष खानोलकर, मिलन चव्हाण, उपसरपंच सुभाष खानोलकर, खानोली ग्रामसेवक प्रसाद अंधारी यासह स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या मार्गावरून पुढील प्रवासासाठी जात असलेल्या वेंगुर्ले-दाभोलीमार्गे सांगली तसेच दाभोली मार्गे कुडाळ याबरोबरच दाभोली मार्ग वेंगुर्लेकडे येणाऱ्या एसटी बस गाड्याही अपघाताच्या अन्य खाजगी वाहने अपघाताच्या दुसऱ्या बाजूला या रस्त्यावर अडकून पडलेले होती. हा अपघात ज्या ठिकाणी घडला. त्या ठिकाणाहून बाबुराव मयेकर यांचे घर सुमारे सातशे मीटर अंतरावर होते.

जाहिरात4