अच्युत भोसले यांचा शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक प्रतिमा देत सत्कार

दोडामार्ग । प्रतिनिधी :
‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्कार प्राप्त यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचा शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक प्रतिमा देऊन दोडामार्ग येथे सन्मान करण्यात आला.शिवशंभू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले आणि पत्रकार संदीप देसाई यांच्याहस्ते अच्युत सावंत भोसले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार गोविंद शिरसाट, सुमित दळवी, रत्नदीप गवस, समीर ठाकूर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अच्युत सावंत भोसले यांनी या सत्काराबद्दल ऋण व्यक्त करी शिवकार्यात आमची आवश्यक असेल तेव्हा मदत देऊ अशी ग्वाही दिली.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये, दोडामार्ग केंद्रप्रमुख प्रा.बाळासाहेब पाटील,कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काटे,प्रा.स्वप्नील सावंत,प्रा.एस.एन.निर्मळकर, दिगंबर पाटील व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात4