असलदे येथील तिहेरी अपघातातील जखमी टेम्पोचालकाचे उपचारादरम्यान निधन

देवगड नांदगांव मार्गावर असलदे येथे १० जुन रोजी एस्टी, डंपर व टेम्पो या वाहनांमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात गंभीर जखमी झालेले टेम्पोेचालक रqवद्र मनोहर लाड(४५) रा.वानिवडे यांचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

देवगड नांदगांव मार्गावर शुक्रवारी दुपारी ३.३० वा सुमारास असलदे पुलानजिक अवघड वळणावर पुणेहून देवगडकडे जाणाèया एस्टी बसची समोरून येणाèया डंपरला जोरदार धडक बसली याचवेळी कणकवलीहून देवगडच्या दिशेने येणाèया टेम्पोचीही एस्टी बसला पाठीमागून धडक बसून अपघात झाला होता.या अपघात एस्टी बसमधील प्रवाशी, डंपरचालक, टेम्पोचालक, एस्टी चालक व वाहक जखमी झाले होते.

अपघातातील गंभीर जखमी झालेले एस्टी चालक महेश आतिग्रे यांचे ११ जुन रोजी कोल्हापूर येथे सीपीआर रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते.तर याच अपघातात गंभीर जखमी झालेले टेम्पोचालक रqवद्र लाड यांचेही दि.१७ जुन रोजी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

रqवद्र लाड हे कणकवली येथून आपला टेम्पो घेवून वानिवडे येथे येत होते.यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी राखी रqवद्र लाड व मुलगी पायल रqवद्र लाड ही होती.अपघातात पत्नी व मुलीही जखमी झाली होती.

जाहिरात4