बांदा खेमराज प्रशालेची विहीर कोसळली

बांदा : प्रतिनिधी
आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने येथील खेमराज मेमोरियल प्रशाळेच्या आवारातील पिण्याच्या पाण्याची दगडी बांधकाम केलेली विहीर आज सायंकाळी अचानक कोसळली. सुदैवाने परिसरात कोणीही नसल्याने दुर्घटना टळली. यामुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची मागिती मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर यांनी दिली.
खेमराज प्रशाळेच्या मुख्याध्यापक दालनाच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. आज दुपारी बांदा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाल्याने मुख्याध्यापक पावसकर यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी विहीर कोसळल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने सायंकाळची घटना असल्याने शाळेत विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र विहीर कोसळल्याने शाळेचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी पंचनामा करून नुकसानीची नोंद केली आहे.

जाहिरात4