भाजप नेते निलेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

आज होतोय ऐतिहासिक कोकण रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पाचा राष्ट्रार्पण सोहळा

रत्नागिरी | प्रतिनिधी : महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण प्रकल्पाचे आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण सोहळा संपन्न होत असताना हे ऐतिहासिक काम केल्याबद्दल भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगलुरु येथून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून झेंडा दाखवत विद्युतीकरण झालेल्या मार्गाचा शुभारंभ करणार आहेत तर कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि ऊडपी या तीन ठिकाणी या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे सोमवारी दुपारी 2:20 वाजता आयोजन करण्यात आले आहे. याचे स्वागत करताना भाजप नेते निलेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट द्वारे आभार मानले आहेत.

निलेश राणे म्हणतात, “कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विद्युतीकरणानं कोकण रेल्वेची इंधन बचत आणि प्रवास मोठ्या प्रमाणात प्रदूषण मुक्त होईल आणि गाड्यांची फ्रिक्वेन्सी देखील वाढणार. पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी हे ऐतिहासिक काम पूर्ण केल्याबद्दल मनापासून आभार.”यामुळे कोकण रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार असून आपल्या खासदारकीच्या काळात भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी विद्युतीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा केला होता.

जाहिरात4