निवळी घाटात कंटेनर कोसळला,चालक जखमी

रत्नागिरी |मुंबई – गोवा महामार्गावरील निवळी घाटातील अवघड वळणावर शनिवारी रात्रीच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर 45 फूट खोल दरीत कोसळला. कंटेनरने पहिली पलटी मारल्यानंतर दुसरी पलटी मारून दरीत कोसळणार एवढ्यात महावितरणच्या पोलला अडकल्याने सुदैवाने खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. यामध्ये महावितरणचा पोल पूर्णपणे वाकला वाकला आहे. चालकाने मात्र प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तोही थोडक्यात बचावला. मात्र तो जखमी झाला आहे. हा अपघात निवळीतील धबधब्यासमोरील अवघड वळणावर झाला. जखमी कंटेनर चालकाला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात4