१९ जून पासून पालशेत मध्ये रंगणार दर्यावर्दी प्रातिष्ठान आयोजित मानाच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार

गुहागर |

●आज पर्यंत ३५ संघांनी सहभाग नोंदविला आहे.
●अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ पहाण्याची क्रिकेट रसिकांना संधी.
●दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत, ता.गुहागर च्यावतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारी मानाची पावसाळी क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कालावधीनंतर यावर्षी उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात रविवार दि.19/06/2022 ते शनिवार दि.25/06/2022 या कालावधीमध्ये दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडानगरी पालशेत, ता. गुहागर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम- 51000/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम- 25000/- व आकर्षक चषक, उत्तेजनार्थ- 2 ,आकर्षक चषक व रोख रक्कम तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर आणि मालिकावीर ही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रवेश फी- 3500/- असून बॉल फ्री ठेवण्यात आला आहे.
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक:-
•विकास दाभोळकर-7030812657
•निलेश पाटील- 8379959356,
•दिनेश जाक्कर- 9420286387
•साईराज दाभोळकर-7378458692
•अपूर्व पाटील- 9403470615

जाहिरात4