गुप्तहेरांचा दावा…रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मृत्यू,

लंडन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन Putin death यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा चेहरा आणि शरीरयष्टीशी साम्य असलेला अन्य एक व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे स्थान स्वीकारत असल्याचा दावा ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणा एमआय-6 ने केला आहे.ब्रिटिश अधिकार्‍यांच्या या वक्तव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

ब्रिटिश अधिकार्‍यांनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन Putin death यांचा मृत्यू झाला असून, बनावट व्यक्तीकडून सत्ता चालवण्यात येत आहे. त्यांचे सहकारी या मृत्यूची बाब जगापासून अनेक आठवडे वा अनेक महिन्यांपर्यंत लपवून ठेवू शकतात. सध्या सार्वजनिक सोहळ्यात जे पुतिन दिसून येतात, त्याचे वृत्तछायाचित्रण अगोदरच करण्यात आले आहे. अन्य माहितीनुसार, पुतिन आजारी असल्याने या काळात संबंधित व्यक्तीचा उपयोग करण्यात आला. क्रेमलिन अर्थात रशियन सरकारमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांचा एक लहान गट असून, ते पुतिन यांच्याप्रति अतिशय प्रामाणिक आहेत.

रशियातील काही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे की, पुतिन Putin death यांच्या मृत्यूचे वृत्त बाहेर आल्यास सत्तापालट होण्याची भीती त्यांच्या सहकार्‍यांना वाटत आहे. तसेच, युक्रेनवरील हल्ले तत्काळ थांबवण्यात येईल. सरकार संपुष्टात आल्याने राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती असल्याने त्यांना जिवंत असल्याचे दर्शविण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांअगोदर एक रशियन श्रीमंत व्यापारी आणि क्रेमलिन सरकारच्या अधिक जवळच्या व्यक्तीने पुतिन यांना कर्करोगाची लागण झाली असून, त्यांची स्थिती चांगली नाही. तसेच, युक्रेन हल्ल्यापूर्वीच त्यांच्यावर शस्त्रकि’या करण्यात आल्याची बाब उघड केली होती.

जाहिरात4