नेपाळ लष्करानं शोधलं दुर्घटनेचं ठिकाण; चक्काचूर झालेल्या विमानाचा PHOTO आला समोर

‘तारा एअरलाइन्स’चं विमान रविवारी नेपाळमध्ये कोसळलं.

‘तारा एअरलाइन्स’चं ट्विन इंजिन ‘9 NAET’ विमान रविवारी नेपाळमध्ये (Nepal Plane Crash) कोसळलं.

नेपाळ लष्करानं (Nepal Army) सोमवारी विमान जिथं कोसळलं, त्या ठिकाणाचा शोध घेतलाय. विमान अपघाताची माहिती गोळा करण्यासाठी लष्करानं सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केलीय. कारण, रविवारी बर्फवृष्टीमुळं शोध मोहीम थांबवण्यात आली होती. नेपाळ लष्करानं ही माहिती दिलीय.

लष्करानं सांगितलं की, बचाव पथकानं अपघातस्थळाचा शोध घेतलाय. लष्करानं मुस्तांगमध्ये कोसळलेल्या विमानाचं ठिकाण थसांग-2 च्या सॅनोसवेअरचं छायाचित्रही शेअर केलंय. नेपाळचे पोलीस निरीक्षक राज कुमार तमांग यांच्या नेतृत्वाखालील पथक विमानानं अपघातस्थळी पोहोचलं आहे. लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ‘काही प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणं कठीण आहे, तरीही मोहीम सुरूच आहे. नेपाळच्या लष्कराला मुस्तांग जिल्ह्यात ‘तारा एअर’ या विमान कंपनीच्या (Tara Air Airlines) दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाबद्दल सुगावा मिळालाय.’

विमानात 22 जण होते

ब्रिगेडियर नारायण सिल्वाल (Brigadier Narayan Silval) म्हणाले, ‘सैनिक आणि बचाव कर्मचार्‍यांनी अपघातस्थळाचा शोध घेतलाय. मुस्तांग जिल्ह्यातील थसांग-2 चे सनोसवेअर हे अपघाताचं ठिकाण आहे. तारा एअरलाइनच्या ट्विन ऑटर 9N-एईटी विमानानं रविवारी सकाळी 10 वाजता पोखरा येथून उड्डाण केलं, परंतु 15 मिनिटांनंतर नियंत्रण टॉवरशी संपर्क तुटला. यात चार भारतीय, दोन जर्मन आणि 13 नेपाळी नागरिकांसह एकूण 22 जण विमानात होते. त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीय.

जाहिरात4