भारतीय नेमबाज अंजली भागवत पोहोचली गुहागरात

कोकणातल्या पर्यटनाने घातली भुरळ

गुहागर । आशिष कारेकर
गुहागरच्या पर्यटनाची भुरळ सर्वानाच पडते.भारताची प्रसिध्द नेमबाज अंजली भागवत हिलादेखील गुहागरच्या पर्यटनाची भुरळ पडल्याशिवाय राहिली नाही.भारतीय नेमबाज अंजली भागवत हिने सहकुटुंब नुकतीच परचुरी येथील आजोळ कृषी पर्यटन केंद्राला सदिच्छा भेट दिली.

गुहागर तालुका हा पर्यटनाच्या नकाशावर आहे.विविध अभिनेत्री,अभिनेते यांना येथील पर्यटनाची ओढ कायम आहे.आता खेळाडूना देखील येथील निसर्गसौंदर्य भुरळ घालू लागले आहे.गुहागर तालुक्यातील परचुरी येथील सत्यवान देरदेकर यांच्या आजोळ कृषी पर्यटन केंद्रात येऊन भारतीय नेमबाज अंजली भागवात हिने येथील पर्यटनाचा आनंद घेतला.सत्यवान देरदेकर यांनी आपल्या पर्यटन केंद्रात मगर सफर,बोटिंग,स्विमिंग अश्या विविध प्रकार उपलब्ध केले आहेत तसेच ग्रामीण भागातील जनजीवन अनुभवण्यासाठी आजोळ कृषी पर्यटन एक उत्तम पर्याय बनला आहे.यासाठीच अंजली भागवत यांनी सहकुटुंब येथे सदिच्छा भेट दिली.

अंजली भागवत ही एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. अंजलीला नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार २००२ साली म्युन्शेन येथे मिळाला. २००३ मध्ये मिलान येथे पैकी ३९९ गुण मिळवून तिने पहिला विश्वचषक जिंकला. तिने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सन २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोचली होती. कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. १० मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्‌स रायफल ३ पी मध्ये तिचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. २००३ मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, भागवतने अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला नेमबाज बनून इतिहास निर्माण केला.

कॉमनवेल्थ खेळामध्ये त्यांनी १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. तसचं, १० मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्‌स रायफल ३ पी प्रकारात त्यांनी आपल्या नावी कॉमनवेल्थ रेकॉर्ड ची नोंद केली आहे. सन २००३ साली आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून पहिल्या भारतीय महिला नेमबाज बनण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.गुहागरच्या पर्यटनाची यानिमित्ताने सर्वांनाच ओढ निर्माण केल्याचे अधोरेखित झाले आहे हे मात्र निश्चित.

जाहिरात4