सुकीवली नजीक धावत्या रेल्वेतुन पडून पोलीस कर्मचारी जखमी

खेड(प्रतिनिधी)

कोकण रेल्वे मार्गावरील सुकीवली गोपाळवाडी नजीक धावत्या रेल्वे मधून एक ४५ वर्षीय पोलीस कर्मचारी रेल्वे रुळावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सांयकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली

उमेश पांडुरंग भोसले रा टेटवली ता दापोली असे त्या जखमी झालेल्या तरुनाचे नाव आहे येथील स्थानकातून मुंबई कडे रवाना झालेली रत्नागिरी दिवा पॅसेंजर मध्ये गर्दी मधून प्रवास करत असलेले भोसले या तरुणाचा अचानक तोल गेल्याने हा तरुण कोकण रेल्वे मार्गावरील सुकीवली नजीक पडला ही बाब काही प्रवाशांच्या लक्षात येताच सुकीवली नजीक गाडी थांबवून ठेवण्यात आली होती

या घटनेची माहिती पोलीस व मदत ग्रुप चे प्रसाद गांधी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले जखमी झालेला भोसले हा तरुण मुंबई पोलीस कर्मचारी असून त्यांची ओळख पटवून कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने अधिक उपचारासाठी प्रसाद गांधी यांच्या रुग्ण वाहिकेने मुंबई येथे हलविण्यात आले आहे

जाहिरात4