शिवणे येथील क्रिकेट स्पर्धेत बापेरे येथील नवलाई संघ उपविजेता

लांजा | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील केळवली येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत लांजा तालुक्यातील
बापेरे येथील नवलाई संघाने उपविजेतेपद पटकावले श्री कालिका माता स्पोटर्स क्लबच्या वतीने आयोजित कार्यसम्राट चषक क्रिकेट स्पर्धा शिवणे येथे नुकतीच पार पडली.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळाला. अंतिम सामन्यात राजापूर केळवली हा संघ विजेता ठरला. तर नवलाई बापेरे संघ उपविजेता ठरला.विजेत्या संघाला नऊ हजार तर उपविजेता संघाला सहा हजार आणि तृृतीय विजेता संघाला चार हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. हि स्पर्धा राजापूर शिवणे येथे झाली .मालिकावीर म्हणून गौरव पराडकर यालाा आकर्षक चषक देण्यात आला

जाहिरात4