कणकवलीत उद्यापासून तीन दिवस श्रीमद् भागवत कथा

कणकवली | प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ‘इस्कॉन’ कणकवलीच्या वतीने श्रीमान महापुरूष प्रभु (वृंदावन) हे कणकवलीत तीन दिवस श्रीमद् भागवत कथा सांगणार आहेत. दि. २३, २४, २५ मे रोजी कणकवलीत येथे आयोजीत केलेल्या या खास कार्यक्रमात सर्वांना प्रवेश मिळणार आहे.

महालक्ष्मी कॉम्प्लेक्स पहिला मजला, डेगवेकर ऑईल मिल शेजारी कॉलेज रोड कणकवली येथे हा विशेष उपक्रम होणार आहे. २३ मे रोजी भागवत कथेची सुरूवात होणार असून किर्तन, कथा आणि प्रसादाचा लाभ कणकवलीवासियांना घेता येणार आहे. सोमवार पासून दररोज संध्याकाळी ६ ते ८.३० वा. तीन दिवस ही पर्वणी सर्वांना अनुभवता येणार आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण… कृष्ण कृष्ण हरे हरे ! हरे राम हरे राम राम राम हरे हरे !! याची अनुभूती घेण्यासाठी या तीन दिवसाच्या सोहळयात प्रत्येकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कणकवली ‘इस्कॉन’ तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात4