कायदा 2000 हा असंविधानिक असून बेकायदेशीर पद्धतीने मंजूर!

अनु. जाती- जमाती आयोगाने गांभीर्याने लक्ष घालावे

‘ऑफ्रोह’ ची लेखी निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी | प्रतिनिधी : महाराष्ट्राचा अनुसूचित जाती जमाती,इमाव,वि.जा, भ.ज. जात- प्रमाणपत्र पडताळणी चा ‘कायदा २०००’ हा असंविधानिक असून तो बेकायदेशीर पद्धतीने मंजूर केला आहे .या कायद्यावरील राष्ट्रपतींची सही ‘लबाडीने’ घेतली असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी ‘ऑफ्रोह ‘ ने राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाला पत्र पठवून यापूर्वीच केली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती- जमाती आयोगाने या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे,अशी विनंती ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ हयुमन शाखा-रत्नागिरी च्या वतीने अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. ज.मो. अभ्यंकर यांजकडे लेखी निवेदनादवारे केली आहे.

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. ज.मो.अभ्यंकर यांच्या रत्नागिरी दौ-या दरम्यान रत्नागिरी रेस्ट हाऊस येथे भेट घेवून त्यांना ‘ऑफ्रोह’ रत्नागिरी च्या वतीने याबाबतचे 16 पानी लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी आयोगाचे सचिव शशांक बर्वे हेही उपस्थित होते. जात प्रमाणपत्र पडताळणीचा कायदा 2000 हा महाराष्ट्रातील 60 ते 70% लोकांवर परिणाम करणारा कायदा आहे. या कायद्यावर राष्ट्रपती महोदयांनी सही करण्यापूर्वी काही शंका असल्याने ते महाराष्ट्र शासनाकडे परत पाठविले होते. राष्ट्रपतींनी सही १६.५.२००१ रोजी केली असे भासविण्यात आले. त्यामुळे याबाबत राष्ट्रपती कार्यालयात याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

या कायद्यावरील राष्ट्रपतींची सही ‘लबाडीने’ घेतली असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी ‘ऑफ्रोह ‘ ने राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाला पत्र पठवून यापूर्वीच केली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती- जमाती आयोगाने या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे,अशी विनंती ऑफ्रोह शाखा-रत्नागिरी च्या वतीने लेखी निवेदनादवारे केली आहे. आयोगाचे अध्यक्ष ज..मो.अभ्यंकर यांना ‘ऑफ्रोह’ रत्नागिरी च्या वतीने महाराष्ट्र शासनाचे माजी उपसचिव मा.प्रा.बी.के.हेडाऊ साहेबांनी लिहिलेले ‘जात प्रमाणपत्र-“घटनेशी लबाडी” कायदा 2000 व नियम 2003’ हे पुस्तकही भेट दिले. यावेळी ‘ऑफ्रोह’चे प्रसिद्धी प्रमुख व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, सौ.सिंधूताई सनगाळे,सचिव बापुराव रोडे,रत्नागिरी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ.नंदा राणे-डांगरे,सभासद नारायण गाजूलवार, तुळशीराम केळधणे, सोहम डांगरे उपस्थित होते.

जाहिरात4