राष्ट्रीय पातळीवरील वेदिक गणित व अबॅकस स्पर्धेत संजिवनी कोचिंग सेंटरचे घवघवीत यश

डॉ. केदार कुंभार यांचे लाभले विशेष मार्गदर्शन

जाकादेवी | वार्ताहर : एप्रिल2022 मध्ये दि गुरू एज्युकेशन इंडिया आयोजित राष्ट्रीय पातळीवरील वेदिक गणित व अबॅकस स्पर्धेचा निकाल 4 मे रोजी जाहीर झाला असून रत्नागिरी येथील *संजिवनी कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सदरच्या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. वेदिक गणित स्पर्धेत इंद्रनील रमेश पाटील याने रँक-2 प्राप्त केला. श्रुतिका शरद माने व वीरप्रतापसिंह सुनील पाटील या विद्यार्थ्यांना रँक -3 विभागून देण्यात आला. तसेच टॉप 10 (A) गटात, संस्कार पांडुरंग पानगले, अश्लेषा अनिल कळंबटे, जिज्ञासा सचिन मोरे, मनोज रमेश पाटील, मयुरेश गजानन कोवळे, तन्मय विजय घाणेकर. टॉप 10 (B) गटात, विराज सुहास देसाई, आशिष अनिल कळंबटे, आर्यन संदीप सनगरे, सुशांत कुमार नाईक, अवधूत महेश देसाई.

टॉप 10 (C) गटात, सुयोग सूर्यकांत कोवळे, निधी रुपेश सुर्वे, साहिल सुनील आखाडे, ओजल भरत कदम, दर्शन रमेश कुंभार, चिराग प्रमोद देसाई, प्राजक्ता पंढरीनाथ जाजनुरे, आर्य सस्मित पवार. टॉप 10 (D) गटात, साहिल रामा झोरे, सोहम राकेश पवार, रिद्धीश रवींद्र माटल, संस्कार संतोष सुर्वे यांनी यश संपादन केले. प्राची सुखदेव गोडसे, साईशा रामा झोरे, चैतन्य विजय धामणे, आराध्य हेमंत उरूनकर, खुदफिया मेहबूब रिफाई या विद्यार्थ्यानी प्रशंसनीय कामगिरी केली.
राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत कु. रवींद्र सुशांत खांडेकर याने टॉप 10 (C- ज्यु.लेव्हल) गटात तसेच कु. शाल्वी नंदकुमार कांबळे हिने टॉप 10 ( E- ज्यु.लेव्हल) गटात नंबर पटकावला. कु.आर्य सस्मित पवार याने अबॅकस level-2 मध्ये राष्ट्रीय रँक 4 संपादन केला. तसेच शिफाबानू जिलान रिफाई, अरशिया मेहबूब रिफाई, खुदफिया मेहबूब रिफाई यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली.

सदरच्या विद्यार्थ्यांना संजिवनी कोचिंग सेंटरचे फाऊंडर व डायरेक्टर डॉ.श्री. केदार रामचंद्र कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ.केदार कुंभार, पालक वर्ग, परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. याआधीही जागतिक पातळीवरील वेदिक गणित स्पर्धेत संजिवनीच्या विद्यार्थ्यानी देदीप्यमान यश संपादन केले होते. वेदांतून घेतलेले वेदिक गणित तसेच परमपूज्य भारती कृष्ण तिर्थाजी यांनी गणितीय सदर्भात केलेले संशोधन व जगाला दिलेली गणितीय भेट ही आजच्या काळाची गरज आहे. डॉ.केदार कुंभार यांच्या माध्यमातून वेदिक गणित शिकून, विद्यार्थी आपला शैक्षणिक, अध्यात्मिक दर्जा उंचावत आहेत. संजीवनी कोचिंग सेंटरचे खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडविण्याचे काम पाहून चाणक्य मंडल परिवाराचे सर्वेसर्वा श्री.अविनाश धर्माधिकारी,(ex.IAS) यांनी डॉ.केदार कुंभार यांचे कौतुक व अभिनंदन केले .सदरच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ पुढील महिन्यात मान्यवरांच्या हस्ते आयोजित केला जाणार आहे.

जाहिरात4