रत्नागिरीत ओबीसी व्हिजेएनटीच्या बहुजन परीषदेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी येथे मंगळवार दिनांक २४ मे २०२२ रोजी ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . कुणबी , भंडारी , मुस्लिम , तेली , खारवी , शिंपी , गाबीत , पांचाळ सुतार , कासार, धनगर , गाबीत , नाभिक अश्या ओबीसी जातींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी या बहुजन परिषदे मध्ये संवाद साधला जणार आहे .

ओबीसी व्हिजेएनटी परीषदेचे प्रमुख वक्ते अरुण खरमते आणि कल्याण दळे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत . ओबीसी नेते नविनचंद्र बांदिवडेकर ओबीसींच्या समस्या आणि तक्रारी या बैठकीच्या माध्यमातुन सरकार कडे पोचविणार आहेत . मंगळवार दिनाक २४ मे २०२२ रोजी ४:०० वाजता व्यंकटेश एक्झ्युकिटिव्ह , मारुती मंदीर येथे आयोजीत केलेल्या या बैठकीला सर्व बहुजन समाजांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन युवा प्रतिनिधी केतन पिलणकर यांनी केले आहे

जाहिरात4