‘सिनर्जी ड्राईव्ह’ यंत्रणा असलेले भारतातील पहिले एमआरआय स्कॅन मशीन चिरायू हॉस्पिटलमध्ये

रत्नागिरी : ‘सिनर्जी ड्राईव्ह’ ही अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित असलेले हिताची व फुजी कंपनीचे एचलोन स्मार्ट एमआरआय स्कॅन मशीन भारतात सर्वप्रथम रत्नागिरीतील चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल झ्ााले आहे.सध्या रत्नागिरीत उपलब्ध असलेल्या कोणत्याही एमआरआय स्कॅन मशीनपेक्षा कमी कालावधीत व जास्त अचूकपणे माहिती मिळून अतिशय क्लिष्ट आणि गंभीर व्याधींचे निदान करणे शक्य होणार असल्याची माहिती चिरायू ग्रुपचे संचालक आनंद फडके, डॉ.सचिन यादव, डॉ.श्रीविजय फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज रविवार दि.22 मे रोजी या मशीनचा शुभारंभ होणार आहे.

कोकणातील प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या चिरायू हॉस्पिटलने सर्वप्रथम नवनवीन अत्याधुनिक सुविधा रत्नागिरीत आणूण रत्नागिरीकरांचे आजार दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. अचूक निदान झ्ााल्यानंतरच योग्य उपचार करणे शक्य होते. त्यासाठी आवश्यक व अत्याधुनिक यंत्रणा असणे आवश्यक होते. यापुर्वी विविध चाचण्या करण्यासाठी मुंबई, पुणेसह कोल्हापूरला जावे लागत होते. यामध्ये वेळ,पैसा दोन्ही वाया जात होते. तर रत्नागिरीतील गरिब रुग्णांना महागड्या शहरांमध्ये जावून उपचार घेणे आर्थिक दृष्ट्‌‍या शक्य होत नाही. स्थानिक स्थरावर आरोग्याच्या दर्जेदार सुविधा असल्यास त्याचा फायदा येथील जनतेला होवू शकतो हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून चिरायू हॉस्पिटलने अत्याधुनिक असलेले हताची व फुजी कंपनीचे एचलोन स्मार्ट एमआरआय स्कॅन मशीन आपल्या तापयात आणले आहे. तर या कंपनीने आपले अत्याधुनिक पहिले मशिन भारतात पहिल्यांचा चिरायू हॉस्पिटलला दिले आहे.

मुंबई-गोवा महामर्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. जखमींमध्ये डोक्याला दुखापत झ्ाालेल्या जखमींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. अशा वेळी दुखापतीचे योग्य निदान झ्ााल्याशिवाय जखमीवर उपचार करणे वैद्यकिय अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. अनेक वेळे रुग्णाला स्थिर केल्यानंतरच एमआयआय चाचणी करावी लागते. मात्र आता उपचार करतानाचा एमआरआय करण्याची सुविधा चिरायु हॉस्पिटमध्ये सुरु झ्ााल्याने रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.
नवीन एमआरआय मशीनमध्ये येणाऱ्या आवाजाची तीव्रता 90 टक्के कमी करून व अधिक सुस्पष्ट स्कॅनची छायाचित्रे प्राप्त होणारे हे मशीन सर्वार्थाजने पेशंट ोंडली असे आहे. शरीरातील खोलवर असलेली एखादी व्याधी व मानवी दृष्टीसाठी अशक्यप्राय वाटणारा एखादा आजार याचे बिनचूक निदान करून त्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे.

स्मार्ट कम्फर्ट सर्वात मोठी कॅप्सूल व अत्यंत कमी आवाज. स्मार्ट क्वालिटी हाय डेफिनिशन सुस्पष्ट इमेजेस व अचूक निदान . स्मार्ट स्पीड नेहमीच्या स्कॅनपेक्षा निम्म्या वेळेत स्कॅन हि मशीनची वैशिष्ट्ये आहेत. ही सेवा पूर्वीप्रमाणे 24 तास उपलब्ध असेल. आजपर्यंत गेली अनेक वर्षे कोकणातील जनतेने चिरायुच्या सर्व उपक्रमांना भरघोस प्रतिसाद व पाठिंबा दिला असून त्यांच्याबरोबर एक वेगळा त्रणानुबंध निर्माण झ्ााला आहे. याचे स्मरण ठेवून एमआरआय स्कॅनच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. आत्तापर्यंत कोकणातील जनतेचा चिरायु हॉस्पिटलच्या सर्व रुग्णोपयोगी सुविधांसाठी नेहमीच सहभाग राहिला आहे. एमआरआय च्या काही तपासण्यांसाठी आजपर्यंत रुग्णांना कोल्हापूर , पुणे अथवा मुंबई येथे जावे लागत होते. परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे एमआर आयच्या सर्व प्रकारच्या तपासण्या इथेच उपलब्ध होतील असे संचालक आनंद फडके यांनी सांगितले.
—–
चौकट
® मशिनद्वारे होणाऱ्या तपासण्या
® मेंदू व शरीरातील रक्तवाहिन्यांची कोणतेही कॉन्ट्रास्टचे इंजेक्शन न देता तपासणी
® एमआर स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे मेंदूतील ट्युमरच्या पेशी व निरोगी पेशी यांच्या वेगवेगळ्या प्रतिमा
® एमआरसिपीद्वारे यकृत व पित्ताशयाचे विविध विकारांची इंजेक्शन न देता तपासणी
® मणक्यांमधील गाठी, चकतीमुुळे पडलेला नस किंवा शिरेवर दाब व त्यामुळे उद्भवणारे आजार
® कर्करोगाच्या गाठी व त्याचा इतर अवयवांत झ्ाालेला प्रसार याचे निदान
® विविध सांधे, खांदा, गुडघा, कमरेचा खुबा व लहान सांधे यांच्या व्याधींचे अचूक निदान
® पचनसंस्था , मज्जासंस्था व रक्ताभिसरण संस्था यांची समग्र तपासण्या.

जाहिरात4