ग्राहकांना दिलासा : पेट्रोल – डिझेल स्वस्त घरगुती गॅस सिलेंडवरही सबसिडी

नवी दिल्ली: केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोलआणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात असताना केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर हा 8 रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा 6 रुपयांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.
याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरला 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना एकूण 12 सिलेंडरपर्यंत ही सबसिडी लागू असेल.

नरेंद्र मोदींनी राज्यांना केलं होतं आवाहन
पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समुळे राज्याच्या तिजोरीत भर पडत असली तरी त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

जाहिरात4