LIC शेअरधारकांना शेअर बाजारांमध्ये 77 हजार कोटीचा चुना

भांडवली बाजारात पदार्पण करणार्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) गुंतवणूकदारांना जोरदार झटका दिला आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांचे चार दिवसांत 77 हजार 600 कोटी बुडाल्याची माहिती समोर आली आहे.एलआयसी हा देशातील आजवरचा मोठा आयपीओ ठरला आहे.मात्र त्याने गुंतवणूकदारांना कंगाल केले.

एलआयसीने मंगळवारी (दि.17) भांडवली बाजारात प्रवेश केला. आयपीओसाठी प्रती शेअर 949 किंमत निश्चित केली होती. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी हा शेअर 867 रुपयांना सूचीबध्द झाला. इश्यू प्राईमच्या तुलनेत शेअरची जवळपास 9 टक्के सवलतीत नोंदणी झाली.पहिल्याच दिवशी एलआयसीचा शेअरने सुमार कामगिरी केली.
एलआयसीचा शेअर इतक्यावरच थांबला नाही तर ही सुमार कामगिरी आठवड्यातील शेवटच्या सत्रापर्यंत सुरु राहिली.शुक्रवारी भांडवली बाजार मंदितून सावरला होता.मात्र यात एलआयसीच्या शेअरला तेजीच्या वाटेवर परतण्यात अपयश आले.शुक्रवारी बाजार बंद होताना बीएसईवर एलआयसीचा शेअर 826.25 रुपयांवर स्थिरावला. त्यात 1.72 टक्के घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजारात तो 825.05 रुपयांवर बंद झाला.
.या पडधडीनंतर शुक्रवार अखेर एलआयसीचे बाजार भांडवल 5,22,602.94 कोटी इतके खाली आले. त्यात 77.629.06 कोटींची घसरण झाली. याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला

जाहिरात4