दापोलीत भामट्याने लिफ्टच्या बहाण्याने चेन केली लंपास

दापोली (प्रतिनिधी) २० मे रोजी लिफ्टच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची चेन लंपास करण्याचा प्रकार काल दुपारी आसूद मार्गावरील गणेशवाडी स्टाॅप परिसरात घडला

दापोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
काल दुपारी पाऊण च्या सुमारास एसटी स्टँड परिसरातून एका दुचाकीस्वाराने आसूद पूल येथे सोडतो असे सांगून नारायण कृष्णा महाडिक वय ७५ याना आपल्या दुचाकीवरून नेले. दरम्यान एक वाजता   गणेशवाडी स्टाॅपजवळ निर्जन ठिकाणी त्या अज्ञात इसमाने गाडी थांबवून मित्राला वस्तू देऊन यायची आहे अशा बहाण्याने गाडी थांबवली.आणि नारायण महाडिक याना बाकावर बसा असे सांगून मित्राला फोन करतो असा बहाणा केला ,इतक्यात त्याने महाडिक यांना तुमच्या डोक्यावर ,मानेवर मुंग्या आहेत असे सांगून  तो त्यांची काॅलर झटकायला लागला  आणि एका झटक्यात गळ्यातील चेन खेचून त्या दुचाकीस्वाराने पोबारा केला. सदर ज्येष्ठ नागरिक झाल्या प्रकाराने भांबावून गेले …अखेर आज त्यानी या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.सदर घटनेचा पोलीस तपास पोलीस उपनिरिक्षक पड्याळ करित आहेत.

जाहिरात4