चिपळुणात खाजगी आराम बस गाडीची बोलेरो पिकअप गाडीला मागाहून धडक

चिपळूण | प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे उभ्या असलेल्या बोलोरो पिकअप गाडीला खाजगी आराम बसची धडक बसून या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी खासगी आराम बस चालकाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची फिर्याद बोलेरो चालक अच्युत गणपत घाडी ( रा. मुंबई) यांनी दिली आहे. तर नितीन रामकृष्ण कदम असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी आराम बस चालकाचे नाव आहे. बोलेरो पिकअप गाडी नादुरुस्त झाल्याने अच्युत घाडी यांनी कापसाळ येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्किंग लाइट लावून उभी करून ठेवली होती. मात्र मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी आराम बस गाडीची या बोलेरो पिकअप गाडीला मागाहून जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बोलेरो पिकअप गाडीत असलेल्या हापूस आंब्याचे देखील नुकसान झाले या प्रकरणी खाजगी आराम बस चालकाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

जाहिरात4