भोस्ते घाटात दुचाकी घसरून तरुणाचा जागीच अंत

खेड | प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील तीव्र उतारात दुचाकी घसरून एका ४२ वर्षीय तरुणाचा जागीच करुण अंत झाला तर अन्य एकजण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

सर्फराज मुकरी (रा महाड नाका) असे त्या जागीच गत प्राण झालेल्या तरुणाचे नाव आहे सर्फराज हा तरुण आपल्या मित्राच्या दुचाकी वरून खेड कडे येत असताना भोस्ते घाटातील एका अवघड वळणावर दुचाकी अचानक घसरली त्यामध्ये सर्फराज याचा जागीच अंत झाला तर अन्य एकजण जखमी झाला या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे

जाहिरात4