रस्त्यावरची सर्व्हिस वायर तोडून इमारतीचे नुकसान

वायर तोडून ट्रक मालकाची अरेरावी

बिल्डींगमधील नागरिक रात्रभर अंधारात

वायर तुटल्याने मीटर रूमचेही नुकसान

रात्रीं उशिरा पोलिसात तक्रार

चिपळूण | प्रतिनिधी : शहरातील खेंड भागातील कांगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सर्विस वायरला आयशर ट्रक क्रमांक MHO4 FJ 8909 ने धडक देऊन सर्व्हिस वायर ओढत नेली, यामुळे रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मी वैभव अपार्टमेंटमध्ये सदर वायरचे मीटररूममध्ये मोडतोड झाली, वायर लगत असलेले सांडपाण्याचे व पिण्याचे पाण्याचे पाईप तुटून निखळून पडले व लक्ष्मी वैभव इमारतीमधील गच्चीवरच्या टाकीमधील सर्व पाणी वाहून गेले. या अपघाताचा आवाज इतका मोठा झाला की परिसरातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

सदर वायर तुटल्यामुळे इमारतीमधील नागरिकांच्या जीविताला हानी पोहोचू शकली असती. या अपघातानंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाला. सिल्वर पॅलेस इमारत, हरी दर्शन इमारत, बावशेवाडी येथील घरांचा विद्युत पुरवठा खंडित झाला, सदर घटनेबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र ट्रक मालक अरेरावीची भाषा करू लागल्याने वातावरण चांगलेच चिघळले. रात्री उशिरा ट्रक चालकाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

जाहिरात4