जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी रफिक मोडक

चिपळूण | वार्ताहर : राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही एकत्र असल्यापासून आपल्या विद्यार्थी दशेपासून १९७८ पासून काँग्रेसचे प्रामाणिकपणे व एकनिष्ठपणे, एकदिलाने माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यावेळी शेखर निकम यांच्याबरोबर व आत्तासुध्दा चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांचे विश्वासू व जवळचे सहकारी मानले जात असूनसुध्दा रफिक मोडक हे दोन्ही काँग्रेसच्या विभाजनानंतर सुध्दा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये राहून निष्ठेने व प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आहेत. १९८८ मध्ये ते बी. एड्. ला असताना कॉलेजचे ते UR झाले.

त्यावेळी मुंबई विद्यापिठामध्ये सिनेटवर निवडून आले. त्यानंतर ते रत्नागिरी जिल्हा NSUI चे सरचिटणीस, रत्नागिरी जिल्हयाचे NSUI चे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश NSUI चे सरचिटणीस, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सचिव तसेच रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस, अल्पसंख्यांकचे जिल्हा उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, प्रवेश फी, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रश्न, एस.टी. सवलत, त्याचबरोबर अनेक सामाजिक समस्यांना आपल्या आंदोलनाद्वारे वाचा फोडल्या. समाजातील अनेक लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या ते नेहमी आपुलकीने सोडवत असतात.

रस्ते, पाणी, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, बचत गट, हायवेच्या समस्या यासाठी नेहमीच ते प्रयत्न करत असतात. आपण पक्ष बळकटीसाठी एकदिलाने व प्रामाणिकपणे नि:स्वार्थीपणे शेवटच्या क्षणापर्यंत झटत राहणार, असा निश्चय त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केला. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जाहिरात4