चिपळूण |
कामथे घाटात बुधवारी संध्याकाळी रिक्षा आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला.
यामध्ये दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला. अपघातामध्ये 6 जण जखमी झाले असून, जखमींना 108 रुग्णवाहिकेचा मदतीने त्यांना वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. महेश मस्के, सहाय्यक – सतीश शिर्के यांनी जखमींना प्रथमउपचार करीत वालावलकर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.