Breaking News : रत्नागिरी शहराला शनिवारपासून एक दिवस आड पाणीपुरवठा

जाणून घ्या तुमच्या घरी कधी येणार पाणी

रत्नागिरी । प्रतिनिधी

शनिवार, दि . 21/05/2022 पासून मान्सुनच्या आगमनापर्यंत शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी शहराचे दोन भाग केले आहेत.

यामध्ये,

शुक्रवार, शनिवार पर्यंत नियमित पाणीपुरवठा तद्व्रतरच पासुन एक दिवस आड जिथे पाणी येईल तो शहराचा भाग – सन्मित्रनगर , गवळीवाडा , आंबेशेत . लांबेचाळ , माळनाका , मारुती मंदिर , एस.व्ही.रोड , हिंद कॉलनी , थिबापॅलेस परीसर , आनंदनगर , विश्वनगर , नूतननगर , अभ्युदयनगर , उदयमनगर , नरहरवसाहत , शिवाजीनगर , साळवी स्टॉप , रमेशनगर , छत्रपतीनगर , सहकारनगर , विष्णूनगर , नवलाईनगर , चाररस्ता मजगाव रोड , स्टेट बँक कॉलनी , म्युनिसिपल कॉलनी , एकता मार्ग , राजापूरकर कॉलनी , कोकणनगर जुने , किर्तीनगर , कोकणनगर- फेज नं . 04

दुसरा दिवस म्हणजेच शुक्रवार पर्यंत नियमित पाणीपुरवठा त्यानंतर एक दिवस आड –
राजिवडा , निवखोल , शिवखोल , गवळीवाडा , बेलबाग , चवंडेवठार , घडेवठार , खडपेवठार , मांडवी , राम आळी , मारुती आळी , गोखले नाका , राधाकृष्ण नाका , झारणी रोड , जेल रोड परिसर , धनजी नाका , आठवडा बाजार , झाडगाव , टिळक आळी , शेरेनाका , तेलीआळी , जोशी पाळंद , वरची आळी , खालची आळी , लघुउद्योग , मुरुगवाडा , मिरकरवाडा , राजवाडी , 80 फुटी हायवे परिसर , पेठ किल्ला , मांडवी , वरचा फगरवठार , पोलीस लाईन , तांबट आळी , भुवड आळी , आंबेडकरवाडी , राहूल कॉलनी , फातीमा नगर , आझाद नगर , कुंभारवाडा

मोठ्या प्रमाणात झालेले बाष्पीभवन आणि वाढलेली मागणी यामुळे शीळ धरण या सध्याच्या शहराच्या एकमेव पाणी पुरवठा स्त्रोतामध्ये केवळ ५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठी असल्याने आता शनिवारपासून शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रनागिरी नगर परिषद कार्यक्षेत्रात शिळधरण, पानवल धरण आणि MIDC या तीन मुख्य उद्भवावर पाणीपुरवठा केला जातो . पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीपासून पूर्ण संपुष्टात आला असून पानवल धरणावरून योजनेतील नविन जलशुद्धीकरण केंद्राच्या कामामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा सप्टेंबर पासुन बंद आहे . सदरील उद्भवावरून नियोजित असलेल्या भागात केवळ शिळ धरण या जलस्त्रोतावरुन पाणीपुरवठा सुरू केला आहे . तसेच , नविन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने MIDC वरुन होणारा पाणीपुरवठा जवळपास बंद केलेला असून केवळ 10 % इतकाच अंशत पाणीपुरवठा सुरु आहे . सद्यस्थितीत संपूर्ण शहरात केवळ शिळ धरण या उद्भवावरून अखंडीतपणे पाणीपुरवठा सुरु आहे .

लांबलेले पर्जन्यमान व उष्ण तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे शहराचा मुख्य जलस्त्रोत असणा-या शिळ धरणातील देखिल पाणीपुरवठा वेगाने कमी होत आहे . सद्यस्थितीत धरणात केवळ 0.589 द.ल.घ.मि. इतकाच जिवंत पाणीसाठा व 0.562 द.ल.घ.मि. इतका मृत पाणीसाठा शिल्लक आहे . सदरील पाणीसाठा केवळ 05 जून पर्यंतच पूरु शकेल . यत्कचित परिस्थितीत मान्सुनचे आगमन लांबल्यास शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . परीणामी , शहरात निर्माण होणा-या संभाव्य पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करणेकामी व पावसाळा हंगाम सुरु होईपर्यंत शहरातील नागरीकांस पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणेकरीता शनिवार दि . 21/05/2022 पासुन मान्सुनच्या आगमनापर्यंत संपुर्ण शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे .

संपूर्ण महाराष्ट्र पाणीटंचाईच्या झळा सोसत असताना पाणीटंचाई कालावधीत देखिल शहरातील नागरीकांस पावसाळी हंगामापर्यंत मुबलक पाणी मिळणेकामी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे . यदा कदाचित मान्सुनच्या अनिश्चिततेचे प्रमाण वाढल्यास धरणातील मृत पाणीसाठा देखिल उपसा करुन जलशुद्धीकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची नगरपरिषदेने पूर्व तयारी केली आहे . तरी , सर्व नागरीकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.

जाहिरात4