कळंबणी येथे लागलेला वाणवा विझवण्यासाठी धावले अनुसया हॉटेलचे कर्मचारी

खेड |

खेड तालुक्यातील कळंबणी येथील अनुसया हॉटेल समोरील गवताला मंगळवारी संध्याकाळी मोठी आग लागली. यावेळी अनुसया हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही आग विझवली आणि मोठे नुकसान होण्यापासून वाचवले.

मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास कळंबणी येथील हॉटेल अनुसया समोर रस्त्यापलीकडे असलेल्या गवताला अचानक आग लागली. ही आग वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरू लागली. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.

अशावेळी अनुसया हॉटेलचे चालक संदेश शिंदे यांच्या माध्यमातून हॉटेलचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले
यावेळी रुग्णवाहिकेचे चालक सर्वेश येरवणकर यांना संपर्क साधून अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचे दीपक देवळेकर आणि सहकाऱ्यांनी तत्काळ आग विझवण्यास सुरुवात केली. तर हॉटेल अनुसया चे कर्मचारी गणेश पार्टे, निलेश कदम, हातीस हंबीर, निलेश हंबीर, पंकज कदम यांनीही पुढाकार घेऊन ही आग विझवण्यासाठी मदत केली.

जाहिरात4