दापोली पोलीस ठाण्याच्या आगीत संशयाचा धूर?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या ट्विटने खळबळ

दापोली | प्रतिनिधी

दापोली पोलीस स्टेशनला लागलेल्या आगीत आता  किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपामुके संशयाचा धुर येऊ लागला आहे. पोलीस ठाण्यात अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट्सची कागदपत्रे, पुरावे होते ते सगळे जळून खाक झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्याची मला काळजी वाटते असे पत्र सोमय्या यांनी दापोली पोलीसस्थानक निरीक्षक श्री.अहिरे यांना दिले आहे.ही आग शॉट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक माहिती असली तरी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपामुळे आता या प्रकरणाच गूढ वाढले आहे. मी पोलीस इन्स्पेक्टरशी संपर्क साधला, त्यांचा प्रतिसाद ऐकून, मला भीती वाटते अशीही प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीवरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.दापोली पोलीस स्टेशनला आग. पोलीस ठाण्यात अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट्सची कागदपत्रे/पुरावे होते. याची काळजी वाटते”, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्यांच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीबाबत किरीट सोमय्यांनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
दापोली पोलीस ठाण्याला शनिवारी सकाळी ६:३०च्या सुमारास अचानक आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या आगीत काही कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स जळाल्याची माहिती समोर आली आहे

जाहिरात4