खेड |
कोकणात रत्नागिरी जिल्हयात मुंबई गोवा महामार्गावर पहाटे तीन वा.च्या सुमारास खेड येथे मुंबईकडे जात असताना क्वालिस कारचा भीषण अपघात झाला आहे.यात कारचालक किशोर अनंत चव्हाण (४८ धामापूर संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.
हा अपघात महामार्ग पोलीस केंद्र असलेल्या कशेडी हद्दीमध्ये महामार्ग क्रमांक 66 वर खेड तालुक्यात खवटी रेल्वेब्रिज जवळ आज १७ मे रोजी सोमवारी पहाटे तीन च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. धामापूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ते मुंबई जाणारी क्वालिस गाडी ( MH 04 BN 4193) वरील चालक किशोर वसंत चव्हाण (वय 48 वर्षे राहणार धामापूर तालुका संगमेश्वर) यांचा गाडीवरील ताबा सुटून त्यांनी आपले ताब्यातील गाडी रस्त्याचे साईडला उभी असणारी आयशर गाडी (क्र. MH 08 AP 6996) हिला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
अपघातामध्ये क्वालीस गाडी वरील चालक किशोर वसंत चव्हाण (वय 48 वर्षे )यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी तपासून घोषित केले. या अपघातात क्वालीस गाडीमधील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये कुमारी सनम संदीप चव्हाण वय 12 वर्षे( डोक्याला गंभीर दुखापत), हर्षदा किशोर चव्हाण वय 40 वर्षे( डोक्याला गंभीर दुखापत), श्री संतोष आबाजी चव्हाण वय 55 वर्ष( डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत), कुमारी रितिका केशव चव्हाण वय16वर्ष( डोक्याला गंभीर दुखापत), कुमार सार्थक किशोर चव्हाण वय 14 वर्ष (उजव्या हाताला किरकोळ दुखापत), सौ स्मिता संतोष चव्हाण वय 50वर्षे( डोक्याला किरकोळ मुकामार), स्नेहा सुरज कर्वे 28 वर्षे (डोक्याला किरकोळ दुखापत) हे जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले यामध्ये श्री. बोडकर,समेल सुर्वे आदी पोलीसांचा समावेश होता.या सगळ्या जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार चालू आहेत. अपघाता मधील वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे.
खवटी येथे झालेल्या अपघातामध्ये 108 ची तत्परता
खेड तालुका खवटी येथे पहाटे भीषण अपघातांनी हादरले. खासगी तवेरा या वाहनाने पाठीमागून धडक देत अपघात केला.व अपघात होऊन 7 जण जखमी झाले. या जखमीना उपचार देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात 108 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून तत्परतेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
. या 7 प्रवाशांना 108 रुग्णवाहिका खेड, कळंबणी च्या डॉक्टर्स आणि सहाय्यक यांनी रुग्णांना कलंबनी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
खेड सहाय्यक – सर्वेश येरवनकर
डॉ. गजानन कोटलवर
कलंबनी सहाय्यक – ऋषिकेश दरेकर
डॉ. हर्षल शिंदे उपस्थित होते.
या 108 रुग्णवाहिका यांच्या तत्परतेमुळे रुणांना वेळेत दाखल करून जखमींना अधिक उपचारासाठी वालावलकर येथे हलविण्यात आले आहे