Devendra Fadanvis: लिलावतीमधील फोटोवरुन कारवाई करणारे औरंगजेबच्या कबरीवर गप्प का?

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्ग्याला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे.

राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही या भेटीवरुन अकबरुद्दीन ओवेसींनी थेट इशारा देत राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. त्यानंतर, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही चालू देणार नाही, असे म्हणत कारवाईची मागणी केली आहे.

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली. माझा एक खासदार आहे, तू तर बेघर आहे. मी तुला काय उत्तर देऊ, अशा शब्दात राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. तत्पूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिल्यामुळे ओवेसींवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. राष्ट्रवादी, मनसे, भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी या कबरीवरील फुलं वाहण्याचा संताप व्यक्त केला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही हे मान्य करणार नाही, त्याची जागा त्याला दाखवून देऊ, अशा शब्दात ओवसींवर प्रहार केला.

”ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालिसा म्हटली की कारवाई होते, पण काश्मिर तोडणाऱ्यांचा नारा देणाऱ्यांवर कारवाई होत नाही, शर्जिलवर कारवाई होत नाही,” अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन करुन तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुसलमानांचा अपमान केला आहे. या देशात औरंगजेब हिंदुंचा तर नाहीच पण मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. कारण या देशावर त्याने आक्रमण केलं आहे, असे म्हणत फडणवीसांनी अकबरुद्दीन औवेसींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात4