Breaking News : अडीच महिन्यांपूर्वी रत्नागिरी शहरातील लॉजवर सापडलेल्या ‘एमडी’ संबंध थेट केरळ पर्यंत

मुख्य संशयित शहर पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी । प्रतिनिधी
दोन महिन्यांपूर्वी शहरातील काँगे्रस भवन येथील निलराज लॉजवर एमडी या अंमली पदार्थासह दोघांना पकडले होते.त्यातील मुख्य आरोपील शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी केरळ मधून अटक केली.बुधवारी त्याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोहम्मद अब्दुल जासीम (27,रा.केरळ) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.1 मार्च रोजी पहाटे 4.45 वा.शहर पोलिस व डिबी पथकाने निलराज लॉजवर छापा टाकून सुमारे 4 लाख 95 हजार रुपयांचा 99 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जत्प केला. त्यावेळी शियाद ए.के(25) आणि नजब मोईद नौफर(25,दोन्ही रा.केरळ) या दोघांना अटक करण्यात आली होती.परंतू या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत होते.याप्रकरणी पोलिसांचे एक पथक केरळला रवाना करण्यात आले होते.या पथकाला मंगळवारी मुख्य आरोपी मोहम्मद जासीमला अटक करण्यात यश आले.बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी 7 दिवसांच्या पोलिस कोठडीत केली.

जाहिरात4