Breaking News : खेडमध्ये मगरीचा तरुणावर हल्ला

नारिंगी नदी किनाऱ्या वरील प्रकार

खेड | प्रतिनिधी

खेड तालुक्यातील नारंगी नदीपात्रात बैलाला पाणी
पिण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या २६ वर्षीय तरुणावर मगरीने हल्ला चढवत जखमी केले. तसेच बैलावरही झडप घालून जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

तरुण जीवन कडू (रा चिंचघर प्रभुवाडी)असे त्या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुण कडू हा तरुण आपल्या बैलाला घेऊन नारंगी नदीपात्रात गेला होता. बैल पाणी पित असतानाच अचानक मगरीने कडू याच्यावर हल्ला केला. या झडपेत मगरीने कडू यांच्या हाताला चावा घेतला. त्याने मगरीच्या तोंडातून हात कसाबसा सोडवला. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. याचवेळी मगरीने पाणी पीत असलेल्या बैलावरही झडप घातली. बैलानेही आपली सुटका करून घेतली. मात्र तोही त्यामध्ये जखमी झाला आहे.

जखमी जीवन कडू याला उपचारासाठी दापोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले .या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात4