कासारवेळी येथे इनोव्हा आणि टेम्पोचा अपघात; टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी | प्रतिनिधी : बेदरकारपणे टेम्पो चालवून समोरील इनोव्हा गाडीला उजव्या बाजूस ठोकर देत अपघात केला. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 मे रोजी रात्री 10.30 वा. कासारवेली येथे घडली.

वैभव रमेश पवार (34,रा.कोतवडे, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात जयेश रमेश किर (38,रा.थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,3 मे रोजी रात्री ते आपल्या ताब्यातील इनोव्हा घेऊन गणपतीपुळे ते रत्नागिरी असे येत होते. त्याचवेळी वैभव पवार आपल्या ताब्यातील ऍपे टेम्पो (एमएच -08-के-6063) घेऊन समोरून येत होता. ही दोन्ही वाहने कासारवेली स्टॉपच्या मागे आली असता टेम्पोची इनोव्हाला ठोकर बसली. अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.

जाहिरात4