Russia: पुतीन यांच्यावर कॅन्सरची शस्त्रक्रिया; पात्रुशेव यांच्याकडे सोपवणार सत्ता

मॉस्को, रशिया : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कर्करोग झाला आहे. त्यामुळे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णलयात भरती व्हावं लागणार आहे. यादरम्यान ते देशाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव (Nikolai Patrushev) यांच्याकडे तात्पुरती सत्ता सोपवू शकतात.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क पोस्टने (New York Post) असा दावा केला आहे. पुतिन (Vladimir Putin) यांना ऑपरेशन करावेच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे. (Vladimir Putin to undergo cancer treatment, handover power to loyalist Nikolai Patrushev)

न्यूयॉर्क पोस्टने टेलिग्राम चॅनेलच्या हवाल्यानुसार हा चॅनेल माजी रशियन (Russia) गुप्तचर एजन्सीचे लेफ्टनंट जनरल चालवतात. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. यानुसार शस्त्रक्रिया आणि पुर्ण बरे होण्यासाठी पुतिन यांना काही काळासाठी पुर्ण विश्रांतीची गरज आहे. यासाठी सत्तेतून बाहेर व्हावे लागेल. न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे की, रशियन अध्यक्षांना कर्करोग (cancer) आणि पार्किन्सन्स (parkinson’s – progressive nervous system disorder that affects movement) रोगासह इतर शारीरिक समस्या असल्याची अफवा अलीकडच्या काळात उडाली होती. तसेच पुतीन यांचे वेगळे दिसणे आणि सार्वजनिक वर्तनाचा उल्लेख आहे. मात्र, एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. (Putin latest Marathi news)

काही दिवसांपूर्वी पुतिन यांनी निकोलाई पास्त्रुशेव यांच्याशी दोन तास चर्चा केली. न्यूयॉर्क पोस्टने टेलिग्राम पोस्टचा हवाला देत म्हटले, “आपल्या सर्वांना माहित आहे की पुतिन यांनी सूचित केले की ते पास्त्रुशेव यांना त्यांचा एकमेव विश्वासू आणि मित्र मानतात. त्याच वेळी, अध्यक्षांनी वचन दिले की जर त्यांची प्रकृती खालावली तर सत्तेते नियंत्रण तात्पुरते पात्रुशेव्हकडे जाईल.”

पुतिन यांच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा दावा करणार्‍या टेलिग्राम चॅनेलच्या मालकाने पात्रुशेव्ह पूर्णपणे दृष्ट असल्याचा दावा केला आहे. ते व्लादिमीर पुतिन यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. त्यापलीकडे ते आणखी सक्रिय आहेत आणि मी आणखी कपटी आहेत असं ते म्हणाले. पात्रुशेव्ह सत्तेवर आल्यास रशियाच्या अडचणी अनेक पटींनी वाढतील असा दावा त्यांनी केला.

जाहिरात4