Video : कुडाळ शहरातील वक्रतुंड संकुलांमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्याने तीन फ्लॅट फोडले

कुडाळ पोलीस १ मे रोजी तपासासाठी घटनास्थळी दाखल

कुडाळ शहरातील वक्रतुंड संकुलांमध्ये बंद असलेले तीन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडले. याबाबत माहिती मिळताच कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी आज १ मे रोजी तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सध्या सुरू आहे. कुडाळ शहरातील वक्रतुंड संकुलातील तीन फ्लॅट रात्री चोरट्यांनी फोडले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच आज सकाळी कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील  यांनी सहकारी पोलिसां सह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

प्रथम दर्शनी संबंधित फ्लॅटधारकांना सोबत संपर्क साधून व फ्लॅटची पाहणी केली असता काही चोरी झाली नसल्याचे दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष फ्लॅट मालकांनी येऊन फ्लॅटची तपासणी केल्यानंतरच चोरीबाबत माहिती स्पष्ट होणार आहे. मात्र शहरातील या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात4