अपहार करून राजेरोस फिरणाऱ्या ग्रामसेवक दीपक केतकर यांना अटक करा

कोटकामते ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक दीपक केतकर यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी देवगड तालुका भाजपा महिला मोर्चाने केली आहे

महिला मोर्चाने आज देवगड पोलिसांना एक निवेदन दिले आहे यामध्ये दीपक केतकर हे कोटकामते येथील ग्रामपंचायतीच्या अपहाराचा आरोपात संशयित आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मात्र ते राजेरोस सर्वत्र फिरत आहेत

त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीचे दप्तर असून ही बाब गंभीर आहे असे निवेदनात म्हटले आहे हे निवेदन तालुकाध्यक्ष केळुसकर यांनी दिले असून यावेळी अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते

 

जाहिरात4