अचानक माकड आल्याने रीक्षेचा अपघात; चालकाचा मृत्यू

रत्नागिरी | प्रतिनिधी

तालुक्यातील भोके आंबेकरवाडी येथे रिक्षेसमोर अचानकपणे माकड आडवे आल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवार 29 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वा.घडली.

मंगेश तानाजी आंबेकर (47, रा. भोके आंबेकरवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.याबाबत दिपक शिवराम आंबेकर (35, रा. भोके आंबेकरवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानूसार, मंगळवारी सायंकाळी मंगेश आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एक्यु-3744) मधून अपघातातील जखमी अरुण गंगाराम सावंत (52) आणि अल्पना अरुण सावंत (दोन्ही रा. भोके बौध्दवाडी, रत्नागिरी) यांना घेउन आंबेकरवाडी ते भोके बौध्दवाडी असे जात होते.ते भोके रल्वेस्टेशन फाटा टेंबरीवाडी येथे आले असता माकडाचे त्यांच्या रिक्षेवर अचानकपणे माकड आडवे आल्याने मंगेश यांचा रिक्षेवरील ताबा सूटला. त्यामुळे रिक्ष उलटून झालेल्या या अपघातात चालक मंगेश आंबेकर आणि रिक्षेतील सावंत दाम्प्त्य जखमी झाले होते.यातील मंगेश यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक जगताप करत आहेत.

जाहिरात4