रत्नागिरी Corona Updates : सोमवारी जिल्ह्यात एकही नवा कोरोना रुग्ण सापडला नाही; उपचाराखाली केवळ १

3corona

रत्नागिरी । प्रतिनिधी :

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारीही एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. तर सध्या केवळ १ रुग्ण कोरोनाचे उपचार घेत असून तोही गृहविलगीकरणामध्ये आहे.

८० जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८४४६७ असून त्यातील आतापर्यंत ८१९३२ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० % इतके आहे.

२४ तासात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये मात्र जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण मृत्यूचे हे प्रमाण ३ टक्के आहे.

जिल्ह्यात एकावर कोरोनाचे उपचार सुरु असून हा रुग्ण गृहविलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात कोरोनाचा एकही रुग्ण उपचाराखाली नाही.

(माहितीसाठी : कोरोना विषयक माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जाते तसेच हि माहिती कोरोना पोर्टल वर update होत असल्याने आकडेवारीत नेहमी बदल होत असतो )

जाहिरात4