केळये येथे टेम्पो पलटी होऊन अपघात; 5 जण जखमी

रत्नागिरी | प्रतिनिधी : केळये येथील उतरत टेम्पो पलटी होऊन पाच जण जखमी झाले. याप्रकारणी बेदरकारपणे टेम्पो
चालवून अपघात करत पाच जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 24 मार्च रोजी सायंकाळी 4.45 वा.मिरजोळे पाटीलवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली आहे.

जहुर फकीर महंमद धर्मे (68, रा.केळ्ये मुस्लिमवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टेम्पा चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात पोलिस नाईक रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,गुरुवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच-08-एच-3316) मधून स्नेहा कांबळे (40), ऋतिक कांबळे (20), दीपिका कांबळे,सुवर्णा कांबळे (सर्व रा. भावेआडम, रत्नागिरी ),आणि दिलशाद माजगावकर (रा.मजगाव, रत्नागिरी सर्वांना घेउन जात होता.तो पाटीलवाडी येथील पाण्याच्या टाकिजवळील उतारात आला असता त्याचा टेम्पोवरील ताबा सूटल्यामुळे तो उलटून अपघात झाला.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार पाटील करत आहेत.

जाहिरात4