Corona Updates : गुरुवारीही रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त

corona

रत्नागिरी | प्रतिनिधी :

आज गुरुवारी २४ मार्चरोजी सुद्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाने बाधीत एकही रुग्ण नाही. यामध्ये रुग्णालयामध्ये ॲडमिट व गृहविलगीकरणा मध्येही कोरोनाने बाधीत एकही रुग्ण जिल्हयात नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आजपर्यंत स्वॅब घेतलेनंतर अबाधित असलेले रुग्ण ९३४५४७ इतके आहेत, कोरोनाने बाधीत झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८४४६६ इतकी आहे. तर ८१९३२ रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले असून, हे प्रमाण ९७ टक्के आहे. तसेच आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या २५३४ इतकी असून, हे प्रमाण ३ टक्के आहे.
बुधवारनंतर आज गुरुवारी सुद्धा रुग्ण नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जाहिरात4