रत्नागिरी Corona Updates : जिल्ह्यात मंगळवारी एकाही रुग्णाची नोंद नाही

3corona
कोरोना मुक्त ५; नवे रुग्ण ०; मृत्यू ०; एकूण उपचाराखाली रुग्ण ६

रत्नागिरी । प्रतिनिधी :

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी एकही कोरोना बाधित रुग्ण स्वॅब तपासणीत आढळून आलेला नाही. तर सध्या केवळ ६ रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत.

३५४ जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८४४६३ असून त्यातील आतापर्यंत ८१९२२ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ % इतके आहे.

२४ तासात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये मात्र जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण मृत्यूचे हे प्रमाण ३ टक्के आहे.

जिल्ह्यात ६ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील ५ रुग्ण गृहविलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. हे प्रमाण ८३.३३ % इतके आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजनावर किंवा आयसीयुमध्ये एकही रुग्ण उपचार घेत नाही.

(माहितीसाठी : कोरोना विषयक माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जाते तसेच हि माहिती कोरोना पोर्टल वर update होत असल्याने आकडेवारीत नेहमी बदल होत असतो )

जाहिरात4